शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर! पुन्हा ” सामना ” रंगणार.

गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. असा अरोप करीत ईडीने जून महिन्यात त्यांना अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर प्रकरणात आज अखेर खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला.

दरम्यान ईडीने सदर जमीनावार आक्षेप नोंदवीत जमीन निकाल राखून ठेवावा अशी मागणी केली आहे. याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. मात्र संजय राऊत यांच्या वकिलाने ईडीने चे सर्व मुद्दे जोरदार युक्तीवाद करीत खोडून काढले. अशी कोणतीही तरतूद घटनेत नसल्याचे कोर्टा समोर नमूद केले.

नेमके काय आहे मुंबईमधील गोरेगाव पत्राचाळ गैरव्यावहार प्रकरण

ज्या पत्राचाळ गैरव्यावहार प्रकरणात खासदार संजय राऊत यांना
100 दिवस जेल मध्ये राहावे लागले ते प्रकरण नेमके काय आहे, ते समजून घ्या. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली.

मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते.

मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचे समोर आले.

Spread the love

Leave a Comment