सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने माढा येथे “श्रीमंती सोलापूरची पुरस्काराचे” वितरण संपन्न.

प्रतिनिधी ( Batami.in टीम ) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहोस्तवी वर्ष निमित्ताने सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार” वितरणाचे आयोजन माढा येथे दि. २१ जून रोजी करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पाच मान्यवर व्यक्तींना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराने ” गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे , शहाजी साठे, हणमंत परबत इ व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी मारुती तुकाराम शिंदे ( पर्यावरण संवर्धक ), नागेश नरसिंह खेडकर ( उपक्रमशील शिक्षक ), सोमनाथ मनोहर डोके ( प्रगतशील शेतकरी ), सुभाष जोतीराम पाटील ( समाजसेवक ), सुलभा प्रकाश कदम ( महिला उद्योजक ) या पाच व्यक्तीना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार ” मान्यवरांच्या हस्ते प्रदान कारण्यात आला. आपल्या क्षेत्रात उतुंग, उल्लेखनीय कार्य करणारी लोक ही त्या गावची, तालुक्याची आणि जिल्ह्याची खारी श्रीमंती असते, गौरव उदगार प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी यावेळी बोलताना करताना काढले.

यावेळी पुरस्कार निवड समिती सदस्य शामराव कदम, डॉ. संतोष दळवी, दत्ता मोरे, डॉ.विवेकानंद पाटील, उमेश शिंदे , समन्वयक विजय कुचेकर, विपुल लावंड व श्रोते मोठया संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थितीत होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता मोरे यांनी केले तर डॉ.विवेकानंद पाटील यांनी उपस्थित्यांचे आभार मानले.

Spread the love

Leave a Comment