दत्तात्रय भुसे, कल्पेश कांबळे, दिनेश लेंगरे, दत्तात्रय वाघ, सुहास आसबे यांना ” श्रीमंती सोलापूरची ” पुरस्कार जाहीर

सोलापूर ( प्रतिनिधी ) : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ” श्रीमंती सोलापूरची ” पुरस्कारची घोषणा कारणात आली असून, मंगळवेढा तालुक्यातील दत्तात्रय भुसे, दत्तात्रय वाघ, कल्पेश कांबळे, दिनेश लेंगरे हे सदर पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. आ. सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवेढा येथे  दि. ६ मे २०२२ रोजी संपन्न होणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील पुरस्कारांचे मानकरी –

दत्तात्रय भुसे ( यशस्वी उद्योजक ), दत्तात्रय वाघ ( उपक्रमशील शिक्षक ), कल्पेश कांबळे ( संगीत विशारद ), दिनेश लेंगरे ( प्रगतशील शेतकरी ), सुहास आसबे ( राष्ट्रीय खेळाडू )

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असून देश अमृत महोस्तव साजरा करीत आहे, याचे औचित्य साधून सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या 5 मान्यवर व्यक्तीना ” श्रीमंती सोलापूरची ” पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दि. ६ मे २०२२ रोजी सायंकाळी 5 वाजता सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट, मंगळवेढा येथे संपन्न होणार असून, सर्वांनी कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे अहवान सोलापूर सोशल फाउंडेशन चे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Comment