सजग नागरिक संघ व सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंवाद मेळावा संपन्न.

 

सजग नागरिक संघ , मंगळवेढा व सोलापूर सोशल फाऊंडेशनयांच्या संयुक्त विद्यमाने सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट मंगळवेढा येथे स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती मा . आ . सुभाष बापू देशमुख यांची होती. सजग नागरिक संघ , मंगळवेढा यांच्या 75 सदस्यांनी नुकताच शिक्षण व आरोग्य सोयी सुविधा अनुषंगाने दिल्ली मॉडल अभ्यास दौरा आयोजित केला होता.

मंगळवेढा मध्ये सुद्धा अशा पद्धतीने शिक्षण व आरोग्य मध्ये विकासात्मक गोष्टी होण्यासाठी पुढील काळात सजग नागरिक संघ , मंगळवेढा प्रयत्न करणार आहे. यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुभाष बापू देशमुख यांच्या उपस्थितीत सजग नागरिक संघाच्या सदस्य संमेवत पुढील ध्येय – धोरणे, कार्यपद्धती, आराखडा या संदर्भात चर्चा कारण्यात आली. यावेळी मा.आ. सुभाष बापू देशमुख यांनी राज्य सरकार व इतर माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वस्त केले.

यावेळी सजग नागरिक संघाचे अध्यक्ष कट्टे सर, उद्योजक अजित कंडरे, कृषिभूषण अंकुश पडवळे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सल्लागार हरिभाऊ यादव, गजानन भाकरे, नगरसेवक अजित जगताप, बापू कवडे, जिप सदस्य नितीन नाकाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विजय कुचेकर यांच्यासह सजग नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.

Spread the love

Leave a Comment