जनावरांना होणाऱ्या ‘ लम्पी ‘ आजारांची लक्षणें व होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र राज्यात ‘ लम्पी ‘ या जनावरांच्या आजाराचा प्रदृभाव वाढत आहेत. दुभत्या जनावरांसाठी घातक असणाऱ्या या आजाराने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. शासन पातळीवर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून लशीकर मोहीम मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. मात्र सदर जनावरांना होणाऱ्या या आजरा विषयी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. सदर आजारची लक्षणें कोणती? तो जनावरांना होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेवू.

‘ लम्पी ‘ आजारापूर्वीची लक्षणे :

• दुभती गाय , म्हैस असेल तर दूध देणं बंद करते
• अंगात ताप वाढतो , पशू चारा खात नाहीत , भूक मरते , पाणी पीत नाहीत नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येते डोळे , मान आणि कास या ठिकाणी 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात
• तोंड खराब होते , डोळ्याला चिपडे येऊन दृष्टी बाधित होते
• पायाला सूज येऊन जनावरं लंगडी होतात , प्रसंगी मृत्यू होतो असा होतो रोगाचा प्रसार :
• चावणाऱ्या माश्या , डास , गोचीड
• बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष स्पर्शाने
दूध पिणाऱ्या वासरांना बाधित गाईच्या दुधातून व सडावरील व्रणातून

‘ लम्पी ‘ होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

• एकमेकांमधील जनावरांची खरेदी – विक्री टाळा गोठ्यात , परिसरात कीटकनाशकांची ( फार्मलिन , सोडियम , हायपोक्लोराईट , फिनाइल ) फवारणी करा , गोठा हवेशीर व कोरडा ठेवा •
• गोठ्यांची नियमित स्वच्छता करावी , जनावरांना नियमित सकस , पौष्टिक चारा द्यावा
• आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ( विलगीकरण ) करा
• नागीलीची पाने , काळी मीरी , मीठाचे मिश्रण करून गुळातून दिवसातून दोनदा आठ दिवस पाजावे कडुनिंबाचा वापर :
• गोठ्यात दररोज कडुनिंबाच्या पानांचा धूर केल्यास व कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्या ठिकाणी कीटके येत नाहीत

Spread the love

Leave a Comment