केंद्रीय तपास यंत्रणांनी मुस्लिम संघटनांवर केलेल्या कारवाईतील कागदपत्रे सामान्य लोकांसमोर मांडावेत – ऍड. प्रकाश आंबेडकर

पुणे – आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो.

परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आणि आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं. असे आवाहन केंद्रीय तपास यंत्रणांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ऍड आंबेडकर म्हणाले, तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते. असेही त्यांनी म्हटले आहे.

Spread the love

Leave a Comment