जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून सुरू ! सविस्तर माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक अपडेट : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधीलशिक्षकांच्या राखडलेली आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून (ता. 9) सुरू होत आहे. सदर बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पोर्टल’चे काम पूर्ण झाल्याचे संबंधित खात्या मार्फत सांगण्यात आले आहे. पोर्टल तयार करण्याचे काम ‘मे. विन्सीस’ या स्वॉफ्टवेअर कंपनीला दिले होते. कंपनीकडून आता स्वॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाले असून, डमी प्रयोग करून बदल्यांची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची माहिती कंपनी कडून देण्यात आली आहे.

बदली आराखडा नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची रिक्त पदे 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आंतरजिल्हा बदल्यांत सहभागी करून घेतले जात नव्हते, आता मात्र, नियमात बदल करीत अशा जिल्हा परिषदांनाही आंतर जिल्हा बदलीत सहभागी करून घेतले जाणार आहे. सदर बाब ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता याही शाळेतील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विज्ञान शिक्षकांची समुपदेशनातून भरणार…

जिल्हा परिषद शाळांमध्ये काही वर्षांपासून विज्ञान शिक्षकांची 687 पदे रिक्त आहेत. पण, आता 9 जूननंतर बारावी विज्ञान विषयातून उत्तीर्ण झालेल्या साडेबाराशे उपशिक्षकांना समुपदेशनातून त्या ठिकाणी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील झेडपी शाळांची, शिक्षक व विद्यार्थी यांचा लेखाजोखा

  • एकूण शाळा – 2797
  • विद्यार्थी संख्या – 2.02 लाख
  • एकूण शिक्षक – 9287
  • विज्ञान शिक्षक मंजूर – 737
  • विज्ञानाचे शिक्षक कमी – 687
Spread the love

Leave a Comment