August 8, 2022

सोलापूर ( बातमी.in टीम )
: विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये अभिजित पाटील यांनी नुकतेच एक हाती यश संपादन करीत, प्रस्थापिताना जोरादार धक्का दिला आहे. या दमदार विजया नंतर ” कामाचा म्हणूस ” ही आपली ओळख असणारे अभिजित पाटील लगेच ऍक्शन मोड मध्ये येत, विठ्ठल साखर कारखाना चालू करायच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. पुढील वर्षाच्या गळीत हंगाम 2022-23 ची तयारी करण्यासाठी त्यांनी कामगारांना कामावर हजर राहण्या संदर्भातील एक परिपत्रक कार्यकारी संचालकाच्या वतीने काढण्यात आले आहे.

विविध जिल्ह्यात सहा कारखाने चालवणारे अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी एक हाती सत्ता कारखान्यात मिळवून डिली आहे. त्यामुळे लगेच कामाला लागत कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने नियोजन होताना दिसत आहे. कायम व कंत्राटी कामगारांना कामावर हजर राहण्या संदर्भात पत्र काढण्यात आले असून, तसा सूचना ही विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.