‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळे हिचा अपघात, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती.

झी मराठी या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

 कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते.

 हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.

 कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या.

 आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता.

 सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.