राज – उद्धव एकत्र येणार? मनसे – शिवसेना युती संदर्भात शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान.

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडा नंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांकडून इच्छा बोलून दाखवल्या जात आहेत. याच संदर्भात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, उत्तर देताना म्हणाल्या की, “साद घातली तर येऊदेत.” त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान शर्मिला ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देतांना असे वक्तव्य केले आहे. आता त्यामुळे पुन्हा दोन ठाकरे एकत्र येण्याच्या देशने हालचाली होणार का? पुढाकार कोण घेणार हाही एक प्रश्न आहे. मात्र शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावर दोन्ही कडील कार्यकर्ते यांच्या आशा पलवीत झाल्या आहेत. मात्र शर्मिला ठाकरे यांच्या म्हण्या नुसार उद्धव ठाकरे साद देणार का हे येणाऱ्या काळात कळेल.

Spread the love

Leave a Comment