प्रतिनिधी ( batami.in टीम ) : दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षेचा निकाल आज दि. 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनीं बाजी मारली आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.
मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले. दरम्यान २०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. २०२१ मध्ये हा निकाल ९९.९५ टक्के होता. २०२१ मध्ये अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल घोषित करण्यात आला होता.